वृक्षवल्ली टीम सिल्लोड पुढाकाराने ज्ञानविकास विद्यालयात 1275 रोपांचे वाटप

Foto
वृक्षवल्ली टीम सिल्लोड तर्फे  'एक विधार्थी एक झाड ' उपक्रमात रोपांची लागवड करून संगोपन करण्याची शपथ..

भराडी येथील ज्ञानविकास विद्यालयाच्या विद्यार्थांनी पर्यावरणाशी मैत्री करून पर्यावरण समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड, संगोपन करावे म्हणून सिल्लोड येथील वृक्षवल्ली टीम सिल्लोड च्या पुढाकाराने जांभूळ, जांब, कडूलिंब, चिंच, कारंजा झाडाची रोपे वाटप करत लागवड कशी करावी, संगोपन कसे करावे यासाठी सिल्लोड येथील वृक्षवल्ली टीम चे अध्यक्ष  डॉ. शेखर दौड,योगेश दिवटे ,डॉ संदीप गायकवाड ,डॉ दीपक अपार , गजाजन काकडे, अशोक सुरडकर,श्री ब्रह्मा आदींनी मार्गदर्शन केले.

आम्ही शपथ घेतो की, पर्यावरणाचा समतोल सुयोग्य ठेवण्यासाठी,रक्षण करण्यासाठी प्रत्येकाने झाड तोडणे टाळत, किमान दहा झाडे लावून संगोपन करावे, पाणी, हवा, मातीशी मैत्री करून प्रदर्शन टाळणार, वृक्षतोड होऊ नये म्हणून जनजागृती करत इतरांना झाडे तोडू देणार नाही., स्वच्छ ,शुद्ध ऑक्सिजन मिळण्यासाठी परिसर हिरवागार ठरण्याची माझी जबाबदारी असून 'वृक्ष लागवड करूया, पर्यावरण वाच ऊया' अशा आशयाची शफथ सर्व मिळून घेण्यात आली.

एच्छिक गुण वृक्ष लागवड करणाऱ्यांना द्यावे म्हणून वृक्ष वल्ली टीम वतीने आवाहन करण्यात आले. डॉ शेखर दौड आणि वृक्षवल्ली टीम सिल्लोड दरवर्षी विद्यार्थांना सोबत घेऊन झाडे लावण्याची भावना त्यांच्या मध्ये रुजवतात,विद्यार्थी जीवनामध्ये एकदा का निसर्गाबद्दलची भावना या वयात दृढ झाली की विद्यार्थी आयुष्यभर निसर्गासाठी कार्य करतात,कुटुंबातील सदस्यांप्रमाणे वृक्षांना जीव लावत जोपासना करा. शासन आदेशाप्रमाणे शिक्षण विभागाचे आवाहन आहेत की शाळा, विद्यार्थी, शिक्षकांनी अधिक क्षमतेने सहभागी होऊन वृक्ष लागवड, संगोपन चळवळ, यशस्वी करूया. 
-अश्विनी लाठकर, शिक्षणा अधिकारी छत्रपती संभाजीनगर.